Thu. Apr 22nd, 2021

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाला सुरुवात

राज्यात 7 जानेवारी रोजी 6 जिल्हा परिषद आणि 44 पंचायत समितीसाठी मतदान आहे. नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम, पालघरमध्ये मतदान आहे. निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहे. महाविकास आघाडी, भाजपाची निवडणुकीत कसोटी आहे.

धुळे –
धुळे जिल्हा परिषदेच्या 51 गट आणि 110 गणांसाठी आज मतदान आहे.

गटात 216 व गणात 397 असे एकूण 613 उमेदवार रिंगणात आहे.

8 जानेवारी रोजी मतमोजणी आहे.

वाशिम जिल्हा परिषदेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.

52 जिल्हा परिषद सदस्य आणि 6 पंचायत समितीच्या 104 सदस्यांसाठी आज मतदान होणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 852 मतदान केंद्रावर 7 लाख 45 हजार 76 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदान शांततेत पार पडावं यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पालघर –
पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचं आज मतदान आहे.
जिल्हा परिषदेच्या 57 तर आठ पंचायत समित्यांच्या 144 जागांसाठी मतदान आहे.
यासाठी दहा लाख 44 हजार 188 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून मतदान प्रक्रियेसाठी 1312 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
जिल्हा परिषदेच्या 57 तर त्या अंतर्गत येणाऱ्या डहाणू, पालघर, तलासरी, वसई,विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे.  राज्य सरकारच्या स्थापनेनंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नागपूर-

नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 1828 मतदान केंद्रावर हे मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या 58 जागांसाठी तर 116 जागांसाठी पंचायत समितीसाठी ही निवडणूक आहे यासाठी मोठी पोलीस व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आली.

नागपूर जिल्हापरिषद निवडणुकीसाठी सकाळपासून मतदार राजा बजावणार मतदानाचा अधिकार बजावत आहे. नागपूर जिल्हा परिषदही सगळ्याच पक्षासाठी महत्वाची असून चांगल्याच प्रचार तोफा इथे गडगडल्या आहेत.

58 सदस्यसंख्या असलेल्या नागपूर जिल्हापरिषदचे 2012 मधील बलाबल-

भाजप (BJP) – 21

काँग्रेस (Congress) – 19

शिवसेना (Shivsena) – 8

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 7

बीएसपी (BSP) – 3

नागपूर जिल्ह्यात 2014 मध्ये विधानसभेत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या.

फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती.

मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून पाच जागा त्यांनी मिळवल्या. अर्ध्यावर भाजपचा जनादेश आला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसत होता.

नागपूर जिल्हा परिषद ही जेवढी भाजपला आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी महत्वाची आहे.

तेवढीच काँग्रेस,  राष्ट्रवादीलासुद्धा ती मिळवायची आहे.

मात्र मतदारराजा आता नेमका कोणाला हा कौल देतो हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *