अंटार्क्टिकातील महाकाय हिमनगाला तडा, भारतावर काय परिणाम होणार?
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अंटार्क्टिकातील समुद्राला तडा गेला आहे. मुख्य समुद्रापासून सर्वात मोठा हिमनग विलग झाला आहे. तब्बल 5 लाख 800 चौरस किमीचा हा हिमनग असून, त्याचं वजन एक लाख कोटी टन इतकं आहे.
मुंबईच्या दहापट आकाराचा हा हिमनग असल्याची माहिती आहे. तसंच अंटार्क्टिका समुद्राला आतापर्यंत पडलेला हा सर्वात मोठा तडा असल्याचं संशोधकांनी म्हटलं.
मुख्य समुद्रापासून हा हिमनग विलग झाल्यानं समुद्राला मोठा तडा गेल्याचं दिसत असून त्यामुळे दक्षिण ध्रुवावर जाणाऱ्या जहाजांच्या प्रवासात अडथळा निर्माण होणार आहे. या तड्याचा नेमका काय परिणाम होईल, यावर आता संशोधन सुरू झाले आहे.