Sun. Jan 16th, 2022

अजिंठा लेणीच्या 300 फूट खोल धबधब्यात पर्यटक पडला!

अजिंठा लेणीच्या 300 फूट खोल धबधब्यात पाय घसरून पर्यटक पडला. त्याला भारतीय पुरातत्व विभाग व स्थानिकांनी पर्यटकाला वाचवले. मुंबई बांद्रा येथील अशोक हुकांडे यांना तीनशे फूट खोल धबधब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

अजिंठा लेणीच्या 300 फूट खोल धबधब्यात पाय घसरून पर्यटक पडला. त्याला भारतीय पुरातत्व विभाग व स्थानिकांनी पर्यटकाला वाचवले. मुंबई बांद्रा येथील अशोक हुकांडे यांना तीनशे फूट खोल धबधब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

देव तारी त्याला कोण मारी

औरंगाबादमधील अजिंठा लेणीच्या बाजूला असलेल्या लेणापुरच्या डोंगरातील सप्तकुंडात एक पर्यटक पाय घसरून पडला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी त्यास सुखरूप कुंडातून बाहेर काढले यामुळे अनर्थं टळला.

अशोक भाऊसाहेब हुकांडे रा. बांद्रा मुंबई असे या पर्यटकाचे नाव आहे. तीनशे फूट खोल धबधब्यात पडल्यानंतरही अशोक हुकांडे यांना सुखरूप बाहेर काढल्याने देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची आठवण नक्की होते.

पर्यटक लेणापूर डोंगरातील निसर्ग सोंदर्य बघण्यासाठी लेणीच्या माथ्यावर चढला व येथील सप्तकुंड धबधब्या जवळ गेला. पण पाण्यात शेवाळ असल्याने कळत न कळत तो कधी खाली ३०० फूट खोल असलेल्या सप्त कुंडात पडला त्याला कळाले नाही.

त्याने आरडा ओरड केल्याने आस पास असलेल्या लोकांनी ही माहिती पुरातत्व अधिकारी डी .एस. दानवे यांना दिली. त्यांनी लगेच दोरी व बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य मागवून नागरिक व पुरातत्व कर्मचारी यांच्या सहाय्याने त्याला कसरत करून बाहेर काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *