Jaimaharashtra news

अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणारी महिला अटकेत

अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ज्योतिषी महिलेला पोलीसांनी अटक केली आहे. या महिलेने स्वत:वरच हल्ला करून घेतला होता. तसेच याबाबतची तक्रार देखील तिने पोलीसांकडे केली आहे. परंतु हा हल्ला खोटा असल्याचे पोलीसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीसांनी तिच्यावर कारवाई केली आहे.

स्वत:वरच हल्ल्याचा बनाव

या महिलेने अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप केला होता.

25 मे रोजी स्वत:वरच हल्ला करवून घेत यानंतर खोटी तक्रार केली.

याबाबत पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

ही महिला २५ मे मॉर्निंग वॉकला गेली असता दोन जणांनी तिच्यावर हल्ला केला.

या दोघांनी तिच्यावर पेपर कटरने हल्ला केला आणि अॅसिड फेकण्याची धमकी दिली.

एक चिट्ठी फेकून ते पसार झाले होते. ‘तक्रार मागे घे’ असे या चिठ्ठीत लिहिण्यात आले होते.

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन दिवसांत हल्लेखोरांचा शोध घेतला.

चार जणांना याप्रकरणी अटक केली. या चौघांची कसून चौकशी केली.

हा योजनाबद्ध हल्ला होता. यासाठी आम्हाला महिलेच्या वकिलाकडून १० हजार रुपये मिळाले होते,

तसेच हा योजनाबद्ध हल्ला होता. असे या चौघांकडून सांगण्यात आलं आहे.

Exit mobile version