Fri. Aug 6th, 2021

अभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपात प्रवेश

आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच असताना भाजपात अनेक राजकीय नेत्यांनी प्रवेश केला आहे. राजकीय नेत्यांसह अनेक दिग्गज कलाकारही भाजपात प्रवेश करत आहेत. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय नेते पक्ष बदलत असल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने दिल्लीत भाजापत प्रवेश केला. आता ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यापूर्वी अभिनेत्री जया प्रदा समाजवादी पार्टीच्या नेत्या होत्या.

अभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपात प्रवेश –

अभिनेत्री जया प्रदा यांनी टीडीपी पार्टीत प्रवेश करून आपला राजकीय प्रवास सुरू केला.

त्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला.

जया प्रदा या 2004 ला रामपूर येथून निवडून आल्या होत्या.

त्यांनी 2004 ते 2014 पर्यंत रामपूरचे खासदार होत्या.

2014 साली आरएलडी या पक्षात प्रवेश केला.

या पक्षातून त्यांनी बीजनोर येथून निवडणूक लढली. मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला.

आज जया प्रदा यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *