Mon. Dec 6th, 2021

अमित शहा टॉप 10 अतिरेक्यांचा खात्मा करणार, गृहमंत्रालयातून यादी जाहीर

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर मोदींनी खातेवाटप केले आणि आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारी अमित शहा यांच्यावर देण्यात आली आहे. अमित शहा यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी जोमाने काम सुरू आहे. दहशत माजविण्यात अग्रेसर असणाऱ्या 10 दहशतवाद्यांची यादी गृहमंत्र्यालयातून जाहीर करण्यात आली आहे.या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमित शहा यांनी पाऊले उचलली आहेत.  यामध्ये विविध दहशतवादी संघटनांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी हो निर्णय घेतला आहे.

हे अतिरेकी मारले जाणार

काश्मिरी नागरिकांना भडकवण्याचे काम हे दहशतवादी करत असल्याने त्यांना वेळी ठेचणे गरजेचे आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर सीमा भागामध्ये नेहमी दहशतवादी हल्ले सुरूचं आहेत.

सीमा भागामध्ये गेल्या काही दिवसात घूसखोरी वाढतच चालली आहे.

याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी जोमाने काम सुरू केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्याचा कट रचणाऱ्या अतिरेक्यांची यादी गृहमंत्रालयाने जाहीर केली आहे

जम्मू काश्मीरच्या घाटामध्ये 286 अतिरेकी सक्रिय असल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.

सुरक्षा दलासोबत चर्चा करून त्यातील 10 दहशतवाद्यांची नावे ठरविण्यात आली आहेत.

जैश-ए-मोहम्मद, लष्कर ए तैयबा, अल बदर आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेतील दहशतवाद्यांचा यात समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *