अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट आकाशातून टीका
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट अवकाशातून टीका करण्यात आली आहे. बुधवारी ऑटोनॉमस स्पेस एजेंसी नेटवर्क अर्थात एसानने एफ्रोडाइट-1 नावाचा हवामानाचा फुगा आकाशात सोडला.
हा फुगा जवळपास 90 हजार फूट उंचावर गेला. जीपीएस सेन्सर आणि कॅमेरा असलेल्या या फुग्यावर एक ट्विट लावण्यात आलं आहे. यामध्ये ट्रम्पविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे.
एफ्रोडाइट-1चं हे पहिलं राजकीय बंड आहे अशा आशयाचा इमेल एसानच्या एका सदस्याने वॉशिंगटन पोस्टला पाठवला आहे. चंद्रावर चालणारी सहावी व्यक्ती आणि अपोलो 14 मधील अंतराळवीर एडगर मिशेल यांच्याद्वारे हे ट्विट
लिहिण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी नासाच्या पृथ्वी विज्ञान कार्यक्रमासाठीचं बजेट कमी केलं त्याचा विरोध म्हणून आम्ही हा संदेश पाठवल्याच एसानतर्फे स्पष्ट करण्यात आले.