Mon. Aug 8th, 2022

अवघ्या 9 दिवसांत ‘कबीर सिंग’ ची कमाई 163 कोटींच्या पार!

शाहिद कपूर, कियारा अडवाणी यांची मुख्य भुमिका असलेला ‘कबीर सिंग’ ने बॅाक्स ऑफिसवर नऊ दिवसांतच १६३.७३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ चा हा रिमेक असून त्याहूनही अधिक कमाई कबीर सिंगने पहिल्या तीन दिवसांत केली. इतकेच नाही तर उरी, केसरी, आणि भारत ला मागे टाकून २०१९ या वर्षातील प्रदर्शनाच्या केवळ दुसऱ्याच शुक्रवारी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.

 

‘कबीर सिंग’ ची कमाई बॅाक्स ऑफिसवर अव्वल !

तेलुगू चित्रपट अर्जुन रेड्डी चा हिंदी रिमेक असलेल्या ‘कबीर सिंग’ ने पहिल्या नऊ दिवसांत १६३.७३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

शाहिद कपूर, कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमाने उरी, केसरी, आणि भारत ला देखील मागे टाकलंय.

बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड करणाऱ्या ‘कबीर सिंग’ ने अर्जुन रेड्डीला देखील मागे टाकले आहे.

सर्वाधिक चित्रपट कमाई स्पर्धेत कबीर सिंग पहिला असून उरी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अक्षयकुमारचा ‘केसरी’ चौथ्या क्रमांकावर तर सलमानच्या भारत ला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

दीडशे कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या ‘कबीर सिंग’ मध्ये शाहिदने एका तापट स्वभावाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची भूमिका साकारली आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन अर्जुन रेड्डी चे दिग्दर्शक संदीप वांगा यांनीच केले आहे.

प्रेक्षकांकडून या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

काहींनी शाहिदच्या अभिनयाचे खूप कौतूक केले असून काहींनी टीकासूद्धा केली आहे.

तर त्याने अभिनय केलेल्या वागण्याचे समर्थनही करता येणार नाही असे काहींचे मत आहे.

शाहिदने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी ही सर्वोत्तम भूमिका असल्याचा ही सूर प्रेक्षकांमधून ऐकायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.