Wed. Jun 26th, 2019

असं असणार आहे नूतन वर्ष!

27Shares

गुढी पाडव्यापासून शालिवाहन शके १९४१, विकारीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी सकाळी सूर्योदयापासून दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत गुढी उभारून नवीन वर्षाचा संकल्प करावा, असं पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे.

 

कसे आहेत नूतन वर्षातील मुहुर्त?

या नूतन संवत्सरामध्ये श्रावण,  भाद्रपद आणि आश्विन हे तीन महिने वगळता उरलेल्या नऊ महिन्यात विवाह मुहूर्त आहेत.

या नूतन संवत्सरामध्ये १७ सप्टेंबर रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे.

सुवर्ण खरेदीदारांसाठी ६ जून, ४ जुलै आणि १ आगस्ट असे तीन गुरुपुष्ययोग आहेत.

 

प्राचीन ग्रंथात ‘अशी’ आहे भविष्यवाणी!

प्राचीन ग्रंथांमध्ये प्रत्येक संवत्सराचे फल दिलेले आहे. हे फल कधी बरोबर येते तर कधी चुकते.

‘ विकारीनाम’  संवत्सरामध्ये ‘पाऊस कमी पडेल.

सत्ताधिकाऱ्य़ांची मनं ताळ्यावर राहणार नाहीत.

पहिली खरिपाची पिकं थोडी येतील.

पुढची रब्बीची पिके चांगली येतील.

आजाराचे प्रमाण थोडे वाढेल.

 

नूतन संवत्सरातील ग्रहणं!

या नूतन संवत्सरामध्ये एकूण चार ग्रहणे आहेत.

२ जुलैचे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.

१६ जुलैचे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल.

२६ डिसेंबर २०१९ चं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे.

या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातील कोइम्बतूर, कन्नूर, करूर, मंगलोर, उटी इत्यादी ठिकाणाहून दिसणार आहे.

उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीमध्ये दिसेल.

१० जानेवारी २०२० चे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.

 

14 एप्रिलला नववर्ष दिन!

चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटकात ‘नववर्ष दिन’ मोठ्या उत्साहात आपण साजरा करतो.

कर्नाटकमध्ये याला ‘ उगादी ‘ म्हणतात.

गुजरातमध्ये कार्तिक शुक्ल प्रतिपदा दिवाळी पाडवा हा नववर्षदिन म्हणून साजरा केला जातो.

दक्षिण भारत, बिहार, ओरिसा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा इत्यादी काही राज्यांमध्ये सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तो नववर्षदिन म्हणून साजरा करतात.

यावर्षी १४ एप्रिल २०१९  रोजी या दिवशी नववर्षदिन साजरा केला जाणार आहे.

27Shares

Leave a Reply

%d bloggers like this: