Wed. Aug 10th, 2022

आंतरराष्ट्रीय योग दिवस

आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचं मोठं महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठं महत्व मिळालं आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात २१ जून २०१५ पासून झाली. या प्राचीन भारतीय पद्धतीला जगमान्यता, राज मान्यता मिळवून देण्यासाठी मोदी सरकारनं मोठा पुढाकार घेतला. २७ सप्टेंबर २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली. भारतातर्फे संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिवसाची शिफारस केली. १९३ पैकी १७५ देशांनी प्रस्ताव तात्काळ स्वीकारला. एखादा प्रस्ताव एवढ्या कमी वेळेत म्हणजे ९० दिवसाच्या आत एवढ्या मोठ्या देशांनी स्वीकारण्याची पहिलीच वेळ होती. आज ठीकठिकाणी योग दिन साजरा केला.

अनेक ठिकाणी योग दिवस साजरा
भारतीय पुरातत्व खात्याकडून योग दिवस साजरा

भारतीय पुरातत्व खात्याकडून आज देशभरातील ७५ महत्त्वाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे.. त्यामध्ये विदर्भातील नागपूर आणि बुलढाण्यातील जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवरावर आज हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे .जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार सरोवराला लागून असलेल्या गौमुख धार येथे हा कार्यक्रम भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नागपूर सर्कल कडून साजरा करण्यात येत आहे.

नायगारा धबधबा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नायगारा धबधबा ठरला योगा उत्सवाचा साक्षीदार. आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी, १९ जून, २०२२ रोजी, न्यूयॉर्कमधील भारतीय महावाणिज्य दूतावासतर्फे, बफेलो-नायगारा तमिळ मंदारम आणि इंडिया असोसिएशन ऑफ बफेलो यांच्या संयुक्त विद्यमाने, न्युयॉर्क येथे नायगारा धबधब्यावर उत्सवाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम नायगारा फॉल्स स्टेट पार्कमधील गोट आयलंडवर झाला, जिथून थेट हा धबधबा दिसतो. १५० योगप्रेमींनी या कार्यक्रमात भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.