Tue. Jun 18th, 2019

आंबे खरेदी करत आहात?… त्यापूर्वी ‘या’कडे लक्ष द्या!

26Shares

बाजारात हापूस आंब्यासह इतर अनेक जातींच्या आंब्यांचे आगमन होऊ लागलंय. मात्र हे आंबे खरेदी करताना ग्राहकांनी अतिशय जागरूक राहून आंबे नीट तपासून घ्यावेत, अशी सूचना अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना दिली आहे. एवढंच नव्हे, तर बाजारात कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. असे आंबे शरीराला घातक आहेत.

आंबे खाताना काळजी घ्या!

आंबे खरेदी करताना ओळखीच्या विक्रेत्यांकडून घ्यावेत.

आंबे खरेदी केल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून मगच त्यांचं सेवन करा.

काही आंबे कॅल्शियम कार्बाईड पावडरने पिकविले जातात.

त्यामुळे या आंब्यांवर काळे डाग पडतात.

असे आंबे ग्राहकांनी घेऊ नयेत.

हंगामाच्या आधी आंबे खरेदी करू नयेत.

कारण ते कृत्रिमरीत्या पिकवलेले असतात.

आंब्याच्या साली खाणं टाळा.

नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा हा पूर्णपणे पिवळ्या रंगाचा दिसतो.

कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा हा पिवळा जरी दिसत असला, तरी देठाकडे हिरव्या रंगाचा असतो.

 

FDAआयुक्त डॉ. पल्लवी दराडे यासंदर्भात म्हणाल्या-

आता आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे.

ग्राहकांनी चांगल्या दर्जाचा आंबा खरेदी करावा.

कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा आढळून आल्यास त्वरित अन्न व औषध सुरक्षा प्रशासना (FDA)ला त्याची माहिती द्यावी.

संबंधित आंबे विक्रेत्यावर FDA कारवाई करेल.

अन्न सुरक्षा कायद्यानुसार रासायनिक पदार्थ (कॅल्शियम कार्बाईड)ने आंबा पिकविण्यावर मनाई आहे.

परंतु 2016 पासून इथिलिन गॅस (इथेफॉन पावडर) मार्फत आंबा पिकविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

 

26Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *