Wed. Jan 19th, 2022

‘आता इंधनाची शंभरी साजरी करा’; काँग्रेसची टीका

 भारताने शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. देशात शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्यामुळे आनंद साजरा होत आहे. मात्र दुसरीकडे इंधनदरवाढीत मोठी झेप घेतली आहे.  देशातील इंधनदरवाढीमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘देशात लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा साजरा केल्यानंतर आता इंधनदराची शंभरीही साजरी करा’, अशी टीका काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर केली आहे.

 काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा साजरा केला. त्यांनी इतरही शंभरी साजरी करून नवा आदर्श समोर ठेवला आहे. काही आठवड्यांपूर्वीच पेट्रोलच्या किंमती प्रती लीटर १०० रुपयांच्या पुढे गेल्या आणि आता डिझेलच्या किंमतींनीही प्रती लीटर १०० रुपयांचा टप्पा गाठला आहे. तसेच सेलिब्रेशनसाठी आणखी एक संधी आणि निमित्त आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या किंमती आता १००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे,’ अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *