आता प्रेयसीलाही द्यावी लागणार पोटगी

सध्या अनेक जोडपी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत हा जणू की नवीन ट्रेंड झाला आहे.परंतु काही दिवसांनी विविध कारणांनी वेगळे होतात. पण आता हायकोर्टाने याबाबतीत एक नवीन नियम लागू केला आहे. लग्नानंतर नवरा बायकोचा काडीमोड झाल्यावर बायकोला जशी पोटगी द्यावी लागते. तशी प्रियेसीला पण आता पोटगी द्यावी लागणार आहे.

प्रेयसीला पोटगी द्यावी लागणार

लग्नानंतर नवरा बायकोचा काडीमोड झाल्यावर बायकोला जशी पोटगी द्यावी लागते. तशी प्रियेसीला पण आता पोटगी द्यावी लागणार आहे.

20 वर्ष एकत्र राहून वेगळं झालेल्या जोडप्याला सुद्धा त्या प्रियकराला त्याच्या प्रेयसीला पोटगी द्यावी लागणार असा निर्णय कोर्टाने दिला आहे.

काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर प्रेयसीला प्रती महिना 5 हजार रूपये देणे कायद्याने अनिवार्य आहे.

या संदर्भातील याचिका दाखल करण्यात आली होती. यावर हा निर्णय देण्यात आला.

या याचिकेवर कोर्टाचा निर्णय

गेले 20 वर्ष हे जोडपे एकत्र राहत होते. यांच्यात वाद झाल्याने कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

प्रेयसी त्याची पत्नी नाही असे याचिकाकर्त्याचं म्हणणं होत.

परंतु गेली 20 वर्ष एकत्र राहत असल्याचे त्या महिलेने सांगितले असून दोघांचे मतदान ओळखपत्र आणि पत्ता एकच आहे.

यावर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

 

Exit mobile version