Sat. Jul 31st, 2021

आता 60 दिवस आधी STचं जाण्यायेण्याचं आरक्षण करता येणार!

गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानाचं आणि येतानाचं आरक्षण करणं शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना 60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली. यासंदर्भात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी माहिती दिली.

ST ने सुरू केलेल्या या सुविधेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना होणार आहे.

ST महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त 2200 जादा बसेसची सोय केली आहे.

या बसचं आरक्षण 27 जुलै (26 जुलैच्या मध्यरात्रीपासून) सुरू होणार आहे.

यंदा पहिल्यांदाच प्रवाशांना रिटर्न ट्रिपचं एकत्रित आरक्षण उपलब्ध करून करून देणं हा यामागचा उद्देश आहे.

एसटी महामंडळाने 60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे

यापूर्वी ही सुविधा 30 दिवस होती.

साहजिकच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याला परतीच्या आरक्षणासाठी तिथल्या बसस्थानकावर ताटकळत उभं राहावं लागणारं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *