Wed. Jun 29th, 2022

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

अयोध्येच्या दौऱ्यासाठी राजकीय नेतेमंडळींमध्ये चढाओढ लागलेली असतानाच महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आधी बाजी मारली आहे. तर दुसरीकडे मनसे मात्र स्थानिक विरोधामुळे अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने काहीशी बॅकफुटला आली असल्याचे दिसून आले आहे. आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा १५ जून म्हणजे आज आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंचा दिवसभराचा असा भरगच्च कार्यक्रम आहे. त्यामध्ये रामललाच्या दर्शनापासून ते सायंकाळी अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर आदित्य ठाकरेंकडून आरती करण्यात येणार आहे. लखनऊ विमानतळावर आदित्य ठाकरे यांनी पत्रकरांशी संवाद साधला. ते म्हणाले, रामललाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ही रामराज्याची भूमी राजकारणाची नव्हे. अयोध्या दौरा राजकीय नाही, हा श्रद्धेचा विषय आहे, असे देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

सकाळी ११ वाजता लखनौ एअरपोर्टवर पोहचतील
दुपारी १.३० वाजता अयोध्येत आगमन होणार
दुपारी ३.३० वाजता रामनगर येथे पत्रकार परिषद
सायंकाळी ५.३० वाजता श्रीरामांचे दर्शन घेणार
सायंकाळी ६.३० वाजता शरयू नदीची आरती करणार
सायंकाळी ७ वाजता लखनौ एअरपोर्टकडे प्रस्थान

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.