Sat. Nov 27th, 2021

आपण औरंगजेबचे वंशज नाहीत- चंद्रकांत पाटील

“महापालिका निवडणुकात ताकद लावली तर आम्हाला संधी आहे, म्हणून शहरात आलोय बैठका घेतोय, असं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीत आम्ही विजय मिळवणारच असे सांगत या शहराचे नाव संभाजी नगर व्हायलाच हवं, आपण सगळे शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे वंशज आहोत आपण औरंगजेबचे वंशज नाहीत त्यामुळं तांत्रिक अडचणी दूर करून नाव बदलायला हवे” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘शेतकरी कर्जमाफी म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे आहे’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. ‘ही फक्त घोषणा आहे, मनापासून नाही, आता म्हणतात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे यादी जाहीर करता येणार नाही मग जे कायदे या आठवड्यात केले ते सगळे रद्द करा, सरपंच निवड कायदा, बाजारसमिती निवडणूक कायदा हे सगळे कायदे रद्द करावे, आम्ही राज्यपालांना निवेदन दिलाय,’ असंही पाटील म्हणाले.

‘पाथर्डी शेतकरी आत्महत्त्या दुर्दैवी’

‘शेतकरी आत्महत्या दुर्दैवी आहे, शेतक-यांच्या पिकांना भाव मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न केले, त्यांना मदत करायला हवी, आमच्या सरकारने केलं, जो पर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही, भाववाढ मिळणार नाही ही परिस्थिती अशीच राहणार’, असं पाटील म्हणाले

‘औरंगाबादच्या गंगापूर मध्ये जी छेडछाड घटना झाली आहे, अशी प्रकरण वाढत आहे, आमच्या सरकारने भरपूर काम केलं, मात्र आता हे सगळं विस्कळीत झालं आहे. कायद्याचा धाक उरला नाही, गुंड बिळातून बाहेर पडले आहेत, आम्ही उद्धवजींना म्हटंले की गृह खाते तुमच्याकडे ठेवा. मात्र कुणीच इंटरेस्टेड नाही’ असं चित्र असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *