Wed. Jun 26th, 2019

आपलेच पैसे मागणाऱ्या बहिणीची मानलेल्या भावाकडून हत्या!

18Shares

मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले 12 लाख रुपये मानलेल्या भावाला जपून ठेवण्यास दिले होते. येत्या 23 एप्रिलला मुलीचे लग्न ठरले. त्याकरिता पैसे मागितले म्हणून मानलेल्या भावानेच गळा आवळून एका महिलेचा खून केला.

भावानेच केली बहिणीची हत्या!

पुण्यातील सिंहगड रस्ता येथील हिंगणे खुर्द भागात शनिवारी ही घटना घडली.

कस्तुरी माने वय 45 असं मयत महिलेचं नाव आहे.

सिंहगड रोड पोलिसांनी याप्रकरणी रविंद्र जालगी वय 48 याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कस्तुरी माने पतीपासून विभक्त राहत होत्या.

एक मुलगा आणि मुलगी आणि मानलेला भाऊ रविंद्र जालगी हे हिंगणे खुर्द परिसरात एकत्र राहत होते.

कस्तुरी माने या ड्रायव्हिंग स्कूल चालवत होत्या.

आतापर्यंत यातून मिळालेले 12 लाख रुपये त्यांनी मुलीच्या लग्नासाठी साठवले होते.

हे पैसे मानलेल्या भावाकडे ठेवले होते. येत्या 23 तारखेला त्यांच्या मुलीचे लग्न ठरले होते.

यासाठी त्यांनी मागील काही दिवसांपासून रविंद्र जालगी याच्याकडे पैसे मागितले होते.

परंतु तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. यातून त्यांच्यात अनेकदा वादही झाले.

शनिवारीही त्यांच्यात यावरूनच वाद झाला.

रविंद्र जालगी याने रागाच्या भरात गळा दाबून कस्तुरी माने हिचा खून केला आणि फरार झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

18Shares

Leave a Reply

%d bloggers like this: