‘आमच्याही हातात दगड असू शकतात’; संजय राऊतांचा इशारा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसंदर्भात आरोप केले होते. त्यामुळे आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘हमाम मे सब नंगे है’, असे सांगत काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. आमच्याही हातात दगड असू शकतात, असा टोला संजय राऊतांनी भाजपवर लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, हमाम मे सब नंगे होते है, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतचे काही पुरावे दिले आहेत. ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. कारण आमच्याही हातात दगड असू शकतो. मात्र आम्ही खालच्या पातळीवर येणार नाही कारण हे पवारांचे संस्कार असलेले राजकारण असल्याचे राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या बड्या नेत्यांवर टीका करण्याची भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे. भाजपने शरद पवारांवर घाणेरड्या पद्धतीने टीका केली आहे त्यामुळे भाजपने या टीकेचा खुलासाही करावा, असे संजय राऊत म्हणाले.