Thu. Jun 20th, 2019

आम्ही कारागृहात राहु शकत नाही, आमची येथून सुटका करा … त्या तीन डॉक्टरांची गयावया

0Shares

मुंबईतल्या सुप्रसिद्ध अशा नायर रुग्णालयात वरीष्ठांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून एका डॉक्टर युवतीने आत्महत्या करून जीवन संपवल आहे. या प्रकरणी तिच्या तीन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. तीन महिला डॉक्टरांची न्यायालयीन कोठडी २४ जूनपर्यंत वाढवण्यात आली असून त्यांच्या जामीन अर्जावर 17 जून रोजी सुनावणी घेण्यात येईल. यावर या तिघींनाही रडू कोसळलं. आम्ही कारागृहात राहु शकत नाही, आमच्या जामिन अर्जावर लवकर सुनावणी करा अशी गयावया त्या करत होत्या.

आमची येथून सुटका करा न्यायालयास विनंती

नायर रुग्णालयात वरीष्ठांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून पायल तडवीने आत्महत्या केली.

या प्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक करत आली आहे.

त्यांची न्यायालयीन कोठडी 24 जूनपर्यंत वाढवण्यात आली तसेच 17 जूनला त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

परंतु न्यायालयाचा हा निर्णय ऐकल्यानंतर या तिघींनीही न्यायालयात हंबरडा फोडला.

आम्ही कारागृहात राहु शकत नाही, आमच्या जामिन अर्जावर लवकर सुनावणी करा अशी गयावया त्या करत होत्या.

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्या ढसाढसा रडायला लागल्या. आपण कारागृहासारख्या ठिकाणी राहू शकत नाही.

आम्ही काहीही केलेले नाही. आमच्यावर अन्याय झाला आहे. आमच्या जामीन अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घ्या

अशी विनवणी करत त्यांनी कोर्टासमोर गयावया केली आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: