Sat. Oct 24th, 2020

आरे कॉलनीत मेट्रोचं काम सूरू असताना आढळला 6 फूट लांबीचा अजगर

मुंबईत सर्वत्र विकासकामे सुरू आहेत. यामध्ये मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असून कुलाबा ते गोरेगाव आरे कॉलनी तसेच मानखुर्द ते अंधेरी डी एन नगर,वडाळा ते ठाणे असं काम सुरू आहे

मुंबईत सर्वत्र विकासकामे सुरू आहेत. यामध्ये मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असून कुलाबा ते गोरेगाव आरे कॉलनी तसेच मानखुर्द ते अंधेरी डी एन नगर,वडाळा ते ठाणे असं काम सुरू आहे. या दरम्यान काम सुरू असताना 6 फूट लांबीचा अजगर आढळला आहे.

मुंबईत जमिनीवर आणि जमिनीखाली मोठ्या मशीनद्वारे खड्डे आणि बोगदे खोदण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनके वन्यजीव मानवी वस्तीत किंवा रस्त्यावर फिरताना आढळत आहेत. आरे कॉलनीत मेट्रो शेडला लागून असलेल्या ठिकाणी आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास 6 फूट लांबीचा अजगर आढळून आला. याची माहिती स्थानिकांनी सर्प मित्रांना दिली.

सर्प मित्रा दुर्गेश कदम आणि पुष्पक तानावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानी या अजगराची सुटका केली आहे.दोन दिवसांपूर्वी हा अजगर रस्त्यावर दिसला होता.हा अजगर सडक पार करून जाताना दिसत आहेत तर हा अजगर जात असताना काही वाहनसुद्धा थांबलेली दिसत आहे.

याचा व्हीडिओ एक वाहनचालकाने आपल्या मोबाईल मध्ये काढला आहे. आरे पोलीस ठाण्यात या अजगराची नोंद करून ठाणे वन विभागात याला सोडून देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *