Tue. Jun 15th, 2021

‘आर्ची’ला बारावीत मिळाले ‘एवढे’ टक्के!

HSC चा निकाल लागला असून राज्यातील 85.88 % विद्यार्थी या परीक्षेत पास झाले आहेत. यावर्षीही परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. याच मुलींमधील एका मुलीच्या निकालाबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती. ती मुलगी म्हणजे अभिनेत्री ‘रिंकू राजगुरू’ म्हणजे ‘सैराट’मधील ‘आर्ची’!

 

रिंकू राजगुरूचं घवघवीत यश!

रिंकू राजगुरुने रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने जशी कमाल केली आहे, तशीच कमाल अभ्यासातही करून दाखवली आहे.

रिंकूला बारावीत 82% मार्क्स मिळाले आहेत.

दोन वर्षापूर्वी आर्चीला 66% मार्क्स मिळाले होते. त्यावेळी रिंकूचा सैराट हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता आणि रिंकूची प्रचंड क्रेझ होती. मात्र अशाही परिस्थितीत तिने फर्स्ट क्लास मिळवला होता. यावेळी तिने त्यापेक्षाही जास्त मार्क्स मिळवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *