आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या पुढील सुनावणी

क्रूझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. याप्रकरणी आर्यन अटक झाली असून त्याप्रकरणी आज आर्यनच्या जामीनावर सुनावणी होणार होती. मात्र आर्यनच्या अर्जावरील उर्वरित सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे आर्यनला आजही दिलासा मिळालेला नाही.
आर्यनचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यनच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद लढला. मात्र आर्यन, अरबाज, मूनमून या तिघांच्या अर्जांवरील पुढील सुनावणी उद्या दुपारी होणार आहे. त्यामुळे आर्यनला जामिन मिळणार की नाही यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.
‘बाहेर राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांशी आर्यनचा काहीही संबंध नाही. आमचा एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांवर आरोप नाही आणि पंच साक्षीदारांशीही आमचा संबंध नाही. आम्हाला आमची बाजू मजबूत करण्यासाठी कोणत्याही आधाराची गरज नाही, त्यामुळे बाहेरच्या आरोप प्रत्यारोपांशी आमचा काहीच संबंध नाही, हे आम्ही प्रतिज्ञापत्रावरही स्पष्ट केलेले आहे,’ असे आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
आर्यनच्या जामिनावर आज युक्तिवाद पूर्ण झाला असून अरबाज आणि मुनमुन यांचा युक्तिवाद अपूर्ण राहिला आहे. आर्यनच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार असून सध्या हे तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.