Wed. Aug 4th, 2021

इथून जाताना माझ्यावर डाग नको, एकनाथ खडसे गहिवरले!

राज्य विधामंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे हे गहिवरले आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर बोलताना त्यांना त्यांच्या भावना आवरता आल्या नाहीत.

राज्य विधामंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे हे गहिवरले आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर बोलताना त्यांना त्यांच्या भावना आवरता आल्या नाहीत. इथून जाताना माझ्यावर डाग नको असो म्हणतं खडसेंच्या या भाषणामुळे त्याचं विधानसभेतील हे शेवटचं भाषण असा प्रश्न मात्र सर्वांना पडला आहे.

खडसे गहिवरले!

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच आणि या सरकारचं शेवटच अधिवेशन पार पडलं.

यावेळी शेवटच्या दिवशी भाजपाचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे हे मात्र गहिवरले.

अधिवेशन काळात एखाद्या व्यक्तीवर पुरावे समोर नसताना आरोप केले जातात आणि ती व्यक्ती बदनाम होते.

तीच राजकीय अस्तित्व पणाला लागतं. असे म्हणत त्यांनी आपल्या भावना मांडल्या.

सभागृहात शेवटच्या दिवशी मला काही मांडायचा असं बोलून त्यांनी आपल मत मांडल आहे.

मागील वर्षात आपल्यावर झालेल्या आरोपंचा खडसेंनी पाढा वाचला हे आरोप सिद्ध झाले नाहीत.

पण त्याची शिक्षा मात्र आज भोगतोय आज माझ्या समाजाला काय वाटतं असेल असे खडसे बोलले.

खडसे बोलत असताना सभागृह मात्र स्तब्ध झाले होते.

खडसेंच्या या भाषणामुळे त्याचं विधानसभेतील हे शेवटचं भाषण असा प्रश्न मात्र सर्वांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *