Sun. Aug 18th, 2019

इसिसचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी ठार झाल्याचे वृत्त

0Shares

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

इसिसचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

 

सीरियातील निरिक्षक गटानं सुत्रांच्या हवाल्यानं हा दावा केला आहे.

 

मानवी हक्कांसाठी हा निरिक्षकांचा गट कार्यरत आहेत. पण याआधीही अनेकवेळा बगदादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला.

 

सिरीयाच्या पूर्वेकडे असणाऱ्या डायर अल झोर शहरातल्या सुत्रांनी हा दावा केला.

 

निरिक्षकांचा हा गट सीरियातल्या गृहयुद्धावर विश्वसनीय माहिती देण्यासाठी ओळखला जातो.

 

पण, तो कधी मारला गेला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.  इसिसशी संबंधित वेबसाईट किंवा सोशल मीडियानंही बगदादी ठार झाल्याबाबत कोणतंही वृत्त दिलेलं नाही.

कोण आहे बगदादी 

 

– सर्वात क्रूर संघटना इसिसचा प्रमुख अबू बकर अल बगदादी

– अबू बकर अल बगदादी जगातला मोस्ट वॉण्टेड दहशतवादी

– 43 वर्षांच्या बगदादीनं बगदादच्या विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली

– लादेन किंवा अल जवाहिरीप्रमाणे व्हिडिओ संदेश देत नाही

– बगदादी जवळच्या सहकाऱ्यांनाही क्वचितच भेटतो

– बगदादी कमांडरना भेटण्यापूर्वी चेहऱ्यावर मास्क लावतो असं बोललं जातं

– सद्दाम हुसैन यांच्या राजवटीत बगदादी कट्टर जिहादी बनला

– दक्षिण इराकमध्ये अमेरिकेच्या कैदेत 4 वर्ष घालवल्यानंतर तो कडवा दहशतवादी बनला

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *