Mon. May 17th, 2021

उर्मिला मातोंडकरबद्दल FB वर अश्लील पोस्ट, महिला कार्यकर्त्यांचा प्रसाद

पुन्हा एकदा काही सोशल मिडिया वापरकर्त्याची विकृती फेसबुकवर दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्या बाबत कोल्हापुरातील एकाने फेसबुकवर अश्लील कॉमेंट केली होती. तर आता मतमोजणी झाल्यानंतर उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याबाबत पुण्यातील एका 57 वर्षीय माणसाने फेसबुकवर अश्लील वक्तव्य करणारी पोस्ट टाकली होती.

त्यानंतर त्याच्यावर टीकांचा भडीमार झालेला पाहून, त्याने पोस्टमध्ये दुरुस्ती केली.

मात्र अनेक सोशल शौकीनांनी तोपर्यंत त्या विकृत व्यक्तीच्या अगोदरच्या पोस्टचे स्क्रीन शॉट सोशल मिडीयावर व्हायरल केले होते.

त्यामुळे उर्मिला मातोंडकर यांची नाहक बदनामी होत असल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी त्या विकृत व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

संबधित व्यक्ती ही बुधवार पेठेत राहत असून महिलांनी त्याच्या घरी जाऊन दरवाज्यावर शाई फेकली आणि घोषणाबाजी केली.

त्यानंतर काल ही व्यक्ती भीतीपोटी मंडई पोलीस चौकीत गेली असता महिला कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन घोषणाबाजी करत त्याला मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी कारवाई करू, असं आश्वासन दिले.

त्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला सोडून देण्यात आले.

काल रात्री अखेर पोलिसांनी त्या विकृत व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई केली आणि त्याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *