Mon. Jun 14th, 2021

एकेकाळचा अभिनेता आता बनलाय वॉचमन, बातमी viral होताच पुन्हा सिनेमांची ऑफर

हिंदी सिनेसृष्टीत रावाचा रंक कधी होईल हे सांगता येत नाही. इथे जेव्हा प्रसिद्धी मिळते, तेव्हा ती भूतो न भविष्यती असते. मात्र जेव्हा तुमच्यावरील स्पॉटलाईट बंद होतो, त्यावेळी कलाकार अंधाऱ्या कोपऱ्यात हरवून जातो. त्याची आठवणही कुणाला राहत नाही. असाच अनुभव सध्या अभिनेता सवी सिद्धू घेतोय. काही काळापूर्वी ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गुलाल’, ‘पटियाला हाऊस’, ‘बेवकूफियाँ’ सिनेमांमध्ये चमकणारा सवी सिद्धू हा अभिनेता सध्या चक्क मुंबईमधील मलाड येथील एका सोसायटीमध्ये चौकीदार म्हणून काम करतोय.

‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गुलाल’, ‘पटियाला हाऊस’, ‘बेवकूफियाँ’ यांसारख्या सिनेमांत महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या सवी सिद्धूकडे आता थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याइतकेही पैसे नाहीत.

याबद्दल सवि सिद्धू यांना शोधून काढणाऱ्या ‘फिल्म कंपॅनियन’ कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

पत्नीच्या निधनानंतर काही काळातच आपले वडील आणि आई यांचाही मृत्यू झाला.

त्यानंतर सासू आणि सासऱ्यांचाही मृत्यू झाल्यामुळे आपण पूर्णतः एकाकी झाल्याचं सिद्धू यांनी म्हटलं.

अशा परिस्थितीत हालाखीचं जीवन जगणारे सिद्धू आता मालाड येथील एका सोसायटीचे सिक्युरिटी गार्ड म्हणून 12 तास नोकरी करतात.

हे काम त्रासदायक असलं, तरी आता इलाज नाही, असं सिद्धू यांना वाटतंय.

सिनेमा बघणंसुद्धा आता एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय, असं ते म्हणाले.

अनुराग कश्यपच्या अनेक सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका करणाऱ्या सवी सिद्धू यांच्या परिस्थितीबद्दल कळल्यावर कश्यप याने पोस्ट लिहून मला तुमचा अभिमान वाटतो, असं सिद्धू यांना म्हटलंय. या परिस्थितीत आपली मदत तुम्ही स्वतःच करायला हवी, असं त्याने म्हटलंय.

चौकीदार असणं एक चांगलं काम आहे. मी कुठलंही काम लहान-मोठे असे मानत नाही.

चॅरिटी कुठल्याही कलेला वा कलाकाराला तगवू श्कत नाही.

एक कलाकार या नात्याने मी सवी सिद्धू यांचा आदर करतो. मी त्यांना तीनदा कास्ट केले.

आज आपली उपजीविका चालवण्यासाठी त्यांनी निवडलेल्या कामाचाही मी आदर करतो.

नवाज हा ही एकेकाळी चौकीदार होता. मी स्वत: एकेकाळी वेटरचे काम केले.

मी ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘सलाम बॉम्बे’च्या अशा अनेक कलाकारांना ओळखतो, जे आज रस्त्यांवर भेळपूरी विकत आहेत, रिक्षा चालवत आहेत.

तुम्ही अशा कलाकारांची मदत करू इच्छित असाल तर पैसे देऊन चित्रपट पाहणे सुरु करा.

असं करून तुम्ही अनेकांना काम देऊ शकता.

मला ट्विट करून फायदा नाही. मी नव्या लोकांना काम दिले आहे आणि देत राहणार आहे,’असे अनुरागने लिहिलं आहे.


 

तसंच अभिनेता राजकुमार राव यानेही ट्विटरवर एक भावूक पोस्ट लिहिली. ‘सवी सिद्धू सर, तुमची कथा खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या सकारात्मक वृत्तीला सलाम करतो.  मी निश्चितपणे माझ्या कास्टिंग मित्रांना तुमची भेट घ्यायला सांगेन,’ असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.

यानंतर CINTAA च्या सदस्यांनी सिद्धू यांची भेट घेतली. तसंच त्यांना आता कामाच्याही ऑफर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे लवकरच ते पुन्हा सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *