‘ए बंद कर रे तो व्हिडीओ’ राज ठाकरे ट्रोल

लोकसभा निवडणूक 2019 चा निकालाचा कौल हा संपुर्णपणे भाजपाच्या बाजूने आहे. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्यांपेक्षा राज ठाकरेंच्या सभांची जास्त चर्चा होती. त्यांनी भाजपावर व्हिडीओच्या माध्यमातून टीका केली होती. परंतु जनतेच्या कौल लक्षात घेता राज ठाकरेंना चांगलच ट्रोल केले जात आहे.

राज ठाकरे ट्रोल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेतल्या.

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.

लाव रे तो व्हिडीओ म्हणत त्यांनी भाजपाच्या अनेक गोष्टींची पोलखोल केली होती.


याचा मतांवर परिणाम होणार असे प्रत्येकाला वाटत होत. परंतु निकालात चित्र काही वेगळचं दिसून आलं.

लोकांनी ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.


राज यांनी सभा घेतलेल्या सर्व १० मतदारसंघांमध्ये युतीचे मतदार आघाडीवर आहेत.

त्यामुळे या सभांचा फायदा नेमका कोणाला झाला असा प्रश्नच आहे.

Exit mobile version