Wed. Aug 10th, 2022

ऐतिहासिक : ‘चांद्रयान 2’ ची चंद्राकडे झेप

श्रीहरीकोट्टाच्या अंतराळकेंद्रावरून ‘चांद्रयान 2’चं प्रक्षेपण झालं आहे. चांद्रयान 2 आता चंद्राकडे झेपावलं आहे. दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी Chandrayan2 अवकाशात झेपावलं आहे. भारतीयांसाठी हा अत्यंत अभिमानाच क्षण आहे.

संपूर्ण जगाचं लक्ष या चांद्रयान 2 मोहिमेकडे लागलं होतं.

सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे चांद्रयान 2 अवकाशात प्रक्षेपित करण्यात आलं.

यापूर्वी 15 जुलै रोजी हे प्रक्षेपण होणार होतं.

पण हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने हे उड्डाण प्रक्षेपणाच्या 56 मिनिटं आधी रद्द करावं लागलं होतं.

मात्र 22 जुलै रोजी इतिहास घडलाय.

दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान 2 ने चंद्राकडे झेप घेतली.

6 सप्टेंबर रोजी हे यान चंद्रावर पोहोचणार आहे.

 

काय आहे चांद्रयान – 2 मोहिम?

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.