Wed. Aug 10th, 2022

ऐतिहासिक! डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची भेट…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग उन यांची भेट घेतली. ही भेट अमेरिकेच्या इतिहासात खूपच महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यापूर्वी अमेरिकेच्या कुठल्याच राष्ट्रध्यक्षांनी उत्तर कोरियात पाऊल ठेवले नव्हते. हुकुमशाहा किम जोंग आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ही तिसरी भेट असून या भेटीमुळे दोन्ही देशातील ताण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

भेटीत काय घडलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग उन यांची भेट घेतली.

ही भेट दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांना विभागणाऱ्या काँक्रिटच्या सीमाभिंतीजवळ झाली.

भेटीत किम जोंग उन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे हस्तांदोलन करत स्वागत केलं.

दरम्यान, ट्रम्प यांनी उत्तर कोरीयाच्या सीमेवर पाऊल ठेवताच किम जोंग उन यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केलं.

हस्तांदोलानंतर दोन्ही नेत्यांनी छायाचित्र काढले आणि दक्षिण कोरियाच्या दिशेने चालत जाऊन उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकारांशी त्यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, ही भेट जगासाठी एक मोलाचा क्षण असून माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.

तसंच दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेवरील सैन्याच्या ताब्यात नसलेल्या जागी किम जोंग उन यांच्याशी बैठक करण्याविषयीची माहिती ट्रम्प यांनी त्यावेळी दिली.

आम्ही खूपच चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत, असेही ते त्यावेळी म्हणाले.

या आधी ट्रम्प यांनी ट्विट करत चीनचे राष्ट्रपती शी. जिनपिंग यांच्या बैठकीसह अन्य महत्वाच्या बैठकींनंतर उत्तर कोरियाच्या नेत्यांची इच्छा असेल तर सीमेवर त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

या भेटीपूर्वी अमेरिकच्या कुठल्याच राष्ट्रध्यक्षांनी उत्तर कोरियामध्ये पाऊल ठेवलेलं नव्हतं. त्यामुळे ही भेट अमेरिकेच्या इतिहासात खूप महत्तवपूर्ण मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.