Mon. Jan 17th, 2022

औरंगाबादच्या नावावरून शिवसेना आणि एमआयएम मध्ये पुन्हा वाद उफळला..

शहरांची नावे बदलण्यावरून याआधी अनेक वेळा वाद उफाळून आला आहे. अशातच औरंगाबादचे नाव हटवून त्याजागी संभाजीनगर नावाची पाटी लावल्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

शहरांची नावे बदलण्यावरून याआधी अनेक वेळा वाद उफाळून आला आहे. अशातच औरंगाबादचे नाव हटवून त्याजागी संभाजीनगर नावाची पाटी लावल्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. रविवारी औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पाटीवरचे नाव खोडून त्यावर संभाजीनगर नावाची पाटी लावल्याची घटना घडली आहे. यापूर्वी औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव असे ठेवण्याची शिवसेनेची मागणी होती. त्यामुळे या प्रकारानंतर शिवसेना आणि एमआयएम यांच्यातला वाद वाढला आहे.

नेमकं  काय घडलं ?

रविवारी औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर औरंगाबाद नावाच्या पाटीवर पिवळा रंग टाकून त्यावर संभाजीनगर नावाची पाटी लावण्यात आली.

ही पाटी लावणाऱ्यांनी आपण शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. यामुळे शिवसेना आणि एमआयएम यांच्यात चांगलाच वाद उफाळून आला.

याप्रकरणी एमआयएमचे कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर पोहोचत तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.या घटनेनंतर औरंगाबाद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर पोलिसांनी संभाजीनगर नावाची पाटी हटवत या प्रकरणी योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. अनधिकृतपणे नाव बदलल्याप्रकरणी संबंधीतांवर कारवाई होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.

शहरांची नावे बदलण्यावरून याआधी अनेक वेळा वाद उफाळून आला आहे. इतकेच काय हा मुद्दा निवडणुकांमध्ये देखील गाजला आहे.

यापूर्वी औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव ठेवण्याविषयी शिवसेनेने मागणी केली होती.

त्यामुळेच शिवसेना आणि एमआयएमचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *