Sun. Oct 24th, 2021

Happy Birthday कतरिना कैफ!

भारताबद्दल फारशी माहिती नसताना, हिंदी भाषेचं काहीही ज्ञान नसताना, अभिनयाची देखील विशेष जाण नसताना एक मॉडेल भारतात येते आणि बघता बघता बॉलिवूडची मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री बनून जाते. असं होऊ शकतं, यावर पटकन कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र या मॉडेलचं नाव कतरिना कैफ असेल, तर?… तर मात्र तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल ना! आज कतरिनाचा वाढदिवस…

आपल्या रूपाच्या बळावर, ग्लॅमर आणि ‘लटके झटके’वाल्या डान्सच्या जोरावर कतरिना बॉलिवूडची ‘चिकनी चमेली’ बनली. ‘भाईजान’ सलमान खान, रणबीर कपूर यांसारख्यांशी ‘खास’ मैत्री अर्थातच तिला उपयोगी पडली. मात्र अक्षय कुमारसोबत तिची फिल्मी जोडी सर्वाधिक सुपरहिट ठरली. डॉक्युड्रामासारखे विषय हाताळणाऱ्या कबीर खानसारख्या दिग्दर्शकाशी तिची मैत्री तिला असे काही रोल्स देऊन गेले, की ती त्याच्या सिनेमांमध्ये eye candie पेक्षा थोडी जास्त महत्त्वपूर्ण ठरली.

कतरिनाची फिगर, तिची स्टाईल आणि हॉट अंदाज याच्यावर भारतीय प्रेक्षक फिदा आहेत. तिचा अभिनय दमदार नसला, तरीही केवळ तिच्या दर्शनासाठी थिएटरमध्ये प्रेक्षक ओढले जातात. आपल्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत तिने जास्तीत जास्त सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

कतरिनाला ब्रिटिश मानलं जात असलं, तरी तिचा जन्म मुळात हॉंगकाँगचा.

सुरुवातीला आपलं कुटुंब सांभाळण्यासाठी मॉडलिंग करुन आपल्या करीअरला सुरुवात केली.

योगायोगाने Bollywood मध्ये तिची एंट्री झाली.

*Boom या चित्रपटाद्वारे 2003 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण.

*New York या चित्रपटासाठी तिला पहिल्यांदाच Filmfare नॉमिनेशन मिळालं.

*सलमान खान आणि रणबीर कपूर ह्यांच्याबरोबरच्या नातेसंबंधामुळे चर्चेत राहिली.

*’मैने प्यार क्यू किया’(2007) यासाठी करिअरमधील पहिलं Stardust Award Breakthrough Female अवॉर्ड मिळालं.

* ‘जिंदगी ना मिलेगी दौबारा’, ‘वेलकम’, ‘दे दनादन’, ‘सिंग इज किंग’, ‘जब तक है जान’, ‘बँग बँग’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘रेस’, ‘धूम 3’, ‘एक था टायगर’, ‘टायगर झिंदा है’, ‘भारत’ या सिनेमांमुळे कतरिना टॉपची अभिनेत्री बनली.

* अनेक सिनेमांत केवळ तिच्या डान्स परफॉर्मंसेसमुळे ती लक्षवेधी ठरली. ‘चिकनी चमेली’, ‘शीला की जवानी’, ‘कमली कमली’, ‘इश्क शावा’, ‘काला चष्मा’ यांसारखी गाणी तिच्या डान्समुळे प्रसिद्ध झाली. 

*एकूण 3 stardust,4 Zee Cine Award, 4 Screen Award, 1 IIFA, 2 Star Guild Award तिने मिळवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *