Fri. Aug 12th, 2022

कस्टम विभागाकडून २१५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या संकल्पनेतून आयोजित आयकॉनिक वीक दरम्यान भारतीय कस्टमने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे ड्रग डिस्ट्रक्शन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या दरम्यान १०६४ किलोग्रॅम मेथॅम्फेटामाइन, २३८ किलोग्रॅम मेफेड्रोन, ४८३ किलोग्रॅम इफेड्रीन आणि २०४ किलोग्रॅम मॅड्राक्स हे अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांची विल्हेवाट लावत नष्ट करण्यात आले. यावेळी एकूण २०४३ किलोग्राम वजनाचे एकूण ड्रग डिस्ट्रक्शन करण्यात आले असून त्याची बाजारभावा प्रमाणे किमंत तब्बल २१५ कोटी इतकी आहे.

देशात विमानतळ, बंदरे, रेल्वे स्थानक येथून अनेकदा अमली पदार्थ विरोधी पथके तसेच केंद्रीय कस्टम विभागाकडून अमली पदार्थ जप्त करून ते सिल केले जातात. हे अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी एनडीपीएस कोर्टाची परवानगी लागते. बुधवारी देशातील १४ केंद्रांवर अशा अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. त्यापैकी तळोजा औद्योगिक वसाहतीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीचा समावेश होता. याठिकाणी सुमारे २०४३ किलोपेक्षा जास्त अमली पदार्थांचा नायनाट करण्यात आला.

ड्रग डिस्ट्रक्शन या कार्यक्रमाच्या वेळी कस्टम विभागाचे अधिकारी तसेच कोस्टल गार्ड, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे डायरेक्ट सोमनाथ मालघर आदि उपस्थित होते.या वेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, महसूल सचिव तरुण बजाज, सीबीआयसीचे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.