काँग्रेसकडून राष्ट्रपतींचा अपमान

सोनिया गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेस नेते तीन दिवसापासून निदर्शने करत आहेत. बुधवारी धरणे आंदोलनादरम्यान पश्चिम बंगालमधील काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी राष्ट्रीय पत्नी असा शब्द वापरला. या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या वाकव्याचा भाजप नेते विरोध करत आहेत.सोबतच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी भाजप नेते करत आहेत.
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, दोन दिवसापासून आम्ही विजय चौकाकडे जात होतो आम्हाला विचारले जात होते तुम्ही कुठे चालला आहात? आम्हाला राष्ट्रपती भवनात जाऊन भेटायचे आहे, असे आम्ही त्यांना सांगत होतो. चुकून माझ्याकडून हा शब्द निघाला आहे, मग मी काय करू ? मला फाशी द्यायची असेल तर फाशी द्या. मी पत्रकारांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते निघून गेले. मी त्याला त्याच वेळी सांगितले असते की हा शब्द चुकून निघाला आहे. अशी माहिती अधीर रंजन चौधरी यांनी दिली.
अधीर रंजन चौधरी यांनी आपल्यावरील राष्ट्रपतींचा अवमान केल्याच्या आरोपाबाबत स्पष्टीकरण देत माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगितले. मी भाजपाची माफी का मागू ? मला माहीत आहे. की जे कोणी भारताचे राष्ट्रपती आहेत, ते आमच्यासाठी राष्ट्रपती आहेत. हा शब्द एकदाच आला आहे. ही चूक झाली आहे मात्र, सत्ताधारी पक्षाचे काही लोक मोहरीचा डोंगर बनवत आहेत, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.