Tue. Sep 27th, 2022

कामावर आलेले ७० एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनात

राज्यातील काही एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. आज एसीटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज एकवीसावा दिवस आहे. दरम्यान सांगलीत कामावर पुन्हा गेलेले ७० एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनात सहभागी झाले आहेत.

विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे वेतनवाढ करण्याचा निर्णय मान्य करत सांगलीतील काही कर्मचारी पुन्हा कामावर रूज झाले होते. मात्र आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कामावर रूजू झालेले ७० एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनात सहभागी झाले आहेत. सांगलीत आंदोलनस्थळी कर्मचाऱ्याचे स्वागत केले. तसेच उर्वरीत कर्माचारी उद्यापर्यंत परतणार असल्याचा विश्वास सांगलीतील कामगार नेत्याने व्यक्त केला आहे.

आज एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा एकविसावा दिवस आहे. तरही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.  तर काही कर्मचारी पुन्हा कामावर रूजू होत आहेत. सांगलीत २ हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. तसेच सांगलीत अनेक ठिकाणी एसटी वाहतूक सुरू झाली असून बससेवाही नियमितपण सुरू झाली आहे. एसटीकडून दररोज ३००हुन अधिक फेऱ्या होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.