Wed. Oct 5th, 2022

कार्ती चिदंबरमच्या घरावर सीबीआयचे छापे

काँग्रेसची जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्या घरावर सीबीआयचे छापेमारी करण्यात आली आहे. कार्ती चिंदबरम यांच्या एकूण 7 मालमत्तांवर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीमध्ये मुंबई, दिल्ली आणि तामिळनाडु या मालमत्तांचा समावेश आहे. सीबीआयने एकाच वेळी ही छापेमार केली आहे. वर्ष २०१० ते २०१४ दरम्यानच्या आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी सीबीआयकडून ही छापेमारी करण्यात आली आहे. एरटेल मॅक्सिस कंपनीकडून पैसे घेतल्याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. कार्ती चिदंबरम यांच्यावर त्यांच्या ओळखीचा वापर करून चीनमधील काही कंपन्यांच्या लोकांना व्हिसा दिल्याचा आरोप आहे ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण 2011 मधील असून कार्ती यांचे वडील पी चिदंबरम् हे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री होते

छापेमारीप्रकरणी कार्ती चिंदंबरम यांचं ट्विट

या ट्विटमध्ये कार्ती चिदंबरम् यांनी सीबीआयच्या छापेमारीनंतर केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा साधला आहे. आतापर्यंत ही छापेमारी किती वेळा झाली आहे, हे मोजायला मी विसरलो आहे. छापेमारीचा हा एक विक्रम असेल, अशा शब्दांत कार्ती यांनी ट्वीट केलं आहे

 

1 thought on “कार्ती चिदंबरमच्या घरावर सीबीआयचे छापे

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.