Fri. Jan 22nd, 2021

काळया पैशासंदर्भातील ‘ते’ ईमेल चौकशीसाठी पुढे पाठवले

 

वृत्तसंस्थ, नवी दिल्ली

 

 

काळया पैशासंदर्भात माहिती द्यायची असल्यास सहजतेने सरकारपर्यंत पोहोचता यावे यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाने डिसेंबर महिन्यात ईमेल आयडीची सेवा सुरु केली होती.

 

सरकारला या ईमेल आयडीवर काळया पैशासंदर्भात आतापर्यंत 38 हजार ईमेल मिळाले असून, त्यातील 16 टक्के ईमेलच पुढे चौकशीसाठी पाठवण्यात आले अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडून देण्यात आली.

 

माहिती अधिकार कार्यकर्ते जीतेंद्र घाडगे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीबीडीटीने ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *