Tue. Oct 26th, 2021

काश्मीरप्रश्नी जगाचा पाकिस्तानवर विश्वासच नाही – पाकिस्तान गृहमंत्री एजाज अहमद

काश्मीरप्रश्नी संपुर्ण जग पाकिस्तानवर विश्वास ठेवत नाही असं मत  पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद यांनी व्यक्त केलं आहे.

काश्मीरप्रश्नी संपुर्ण जग पाकिस्तानवर विश्वास ठेवत नाही असं मत  पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद यांनी व्यक्त केलं आहे. पाकिस्तानात दहशतवादी सक्रिय असल्याचंही त्यांनी कबूल केलं आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पाकचे गृहमंत्री एजाज अहमद यांना खंत

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी काश्मीरमध्ये हिंसा पसरवली आहे. त्यांच्यावर इम्रान खान सरकार कारवाई करत आहे. परंतु संपूर्ण जगात पाकिस्तानची प्रतिमा एक जबाबदार राष्ट्र अशी झाली आहे. पाकिस्तानात दहशतवादी सक्रिय असल्याचे देखील त्यांनी कबूल केले आहे.

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी अफगाणिस्तान युद्धात सहभाग घेतला त्यामुळे काश्मीरमधील शांतता भंग झाली. अशी कबुली देखील त्यांनी दिली आहे. तसेच इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील 30 ते 40 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले आहे. असा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला आहे.

काश्मीरमध्ये जमावबंदी लागू करत भारताने कलम 370 रद्द केले आहे. तरीही जगाचा भारतावर विश्वास आहे. यामध्ये काश्मीरमधील लोकांचे हाल होत आहेत. असं ही ते म्हणाले आहेत. पाकिस्तानच्या आधीच्या सरकारवरही निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *