Sat. Aug 17th, 2019

कुलभूषण जाधव प्रकरणी खटला चालवण्यासाठी ‘त्यांनी’ घेतला फक्त 1 रुपया!

0Shares

ICJ मध्ये बुधवारी कुलभूषण जाधव प्रकरणात 16 पैकी 15 न्यायाधीशांनी आपला निकाला भारताच्या बाजूने सुनावला. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याच्या पाकिस्तानच्या नापाक इराद्यांच्या चिंधड्या झाल्या. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. तसंच भारताच्या दुतावासाची मदत जाधव यांना घेता येणार आहे. यासाठी कोर्टाने भारताची बाजू घेत पाकिस्तानला खडे बोल सुनावले. मात्र यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू अत्यंत सक्षमपणे मांडण्यात आली ती वरिष्ठ वकील हरीश साळवे यांच्याकडून.

हरीश साळवे हे वकिली क्षेत्रातील मोठं नाव आहे.

सलमान खानची केसही हरीश साळवेच लढत आहेत.

खटल्याचे नव्हे तर एकेका सुनावणीचे 30 लाख रुपये ते घेतात, असं सांगितलं जातं.

देशातल्या सर्वांत महागड्या वकिलांपैकी ते एक आहेत.

मात्र आंतरराष्ट्रीय न्यायलयात कुलभूषण जाधव प्रकरणासाठी त्यांनी केवळ 1 रुपया एतकं नाममात्र शुल्क आकारलंय.

दुसरीकडे पाकिस्तानला मात्र देशात महागाईचा भडका उडाला असतानाही खटला चालवण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.

एवढं करूनही पाकिस्तानच्या पदरी आंतरराष्ट्रीय कोर्टात निराशाच आलीय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *