कॉंग्रेसची रखडलेली कामंही आम्ही मार्गी लावली- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज निवडणुकांपूर्वी लोकसभेत शेवटचे भाषण केले. यावेळी मोदींनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. कॉंग्रेसने जे ५५ वर्षात केले नाही ते आम्ही ५५ महिन्यात केले असेही म्हणत आपल्या कामाचा पाढा वाचलायला सुरुवात केली. ‘आम्ही अनेक कामं पूर्ण केल्याचा’ दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच ‘कॉंग्रेसची रखडलेली कामंही आम्ही मार्गी लावल्याचे’ त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. कॉंग्रेस अंहकारामुळे ४०० जागांवरून ४०वर पोहोचली आहे. मात्र भाजप कामामुळे २ जागांवरून २०० जागांवर पोहोचली असल्याचे नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले.
मोदींनी पाच वर्षात काय केले ?
४० कोटी घरात वीज कनेक्शन दिली.
१३ कोटी गॅस कनेक्शन दिले.
१० कोटी शौचालय बांधले.
भाजप सरकार येण्यापूर्वी देशात ३५ घरं बांधली. मात्र भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर १ कोटी ३० लाख घरं बांधली.
५९ गावात ऑप्टीकल फायबर पोहोचली आहे.
मुद्रा योजनेद्वारे कोट्यवधी युवकांना रोजगार मिळाला.
भाजप सरकारने सर्जिकल स्ट्राईक केले.
कॉंग्रेसच्या राज्यात लष्कराला बुलेट प्रूफ जॅकेट, चांगले बूट दिले नव्हते. मात्र भाजपने २०१६ साली १ लाख ८६ हजार बुलेट प्रूफ जॅकेट खरेदी केले.
भाजप सरकारने भ्रष्ट्राचाराविरुध्द झिरो टॉलरन्स नीती
नोटबंदीनंतर ३ लाख बनावट कंपन्या बंद पडल्या आहेत.
२० हजार पेक्षा जास्त NGOचं विदेशी फंडीग बंद केले.
९९ टक्के वस्तू १८ टक्के GST आहेत.
शैक्षणिक कर्ज १५ वरुन ११ टक्क्यांवर आणले आहे.
LED ब्लब लावल्यामुळे ५० हजार कोटी वाचलेत आहेत.
जिल्हा स्तरावर डायलीसीस सुविधा मोफत केल्या आहेत.
जेनरीक औषधांच्या माध्यमातून औषधं स्वस्त केली.
‘आयुष्यमान भारता’च्या माध्यमातून ११ कोटी गरीब रुग्णांची सेवा आणि फायदा झाला.
SC, ST, OBC आरक्षणाला धक्का न लावता १० टक्के आरक्षण दिले.
१ लाख ८ हजार लोकांनी EPF खाती उघडली आहे.
मुद्रा योजनेच्या माध्यमातून सव्वा चार कोटींना कर्ज मिळाले. तसेच रोजगारही मिळाला.
स्टार्ट अप, स्टँड अपच्या माध्यमातून कोट्यवधी रोजगार उपलब्ध झाले आहेत.
भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद केली. १२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जाणार
कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेकांना प्रशिक्षित केले.
पेन्शन योजनेच्या माध्यमातून अनेकांना लाभ होणार असल्याचे मोदींनी सांगितले.