Tue. Dec 7th, 2021

कोल्हापूरात राष्ट्रवादीचे खेकड्यांना पोलिसांच्या ताब्यात देत आंदोलन

खेकड्यांनी भोकं पाडल्याने भगदाड पडल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  खेकडे हाती घेवून आंदोलन करण्यात आले आहे. 

रत्नागिरीतील चिपळून तालुक्यातले तिवरे धरण फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. या धरणफुटीत 18 मृतदेह हाती लागले असून अद्याप 5 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

यातच खेकड्यांनी भोकं पाडल्याने भगदाड पडल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  खेकडे हाती घेवून आंदोलन करण्यात आले आहे.

कोल्हापूरात खेकडे आंदोलन

रत्नागिरी येथे झालेला धरण दुर्घटनेला खेकडे जबाबदार आहेत या राज्यातील मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष मेहेबूब शेख यांनी चक्क आरोपी म्हणून खेकड्याना कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसांच्या हवाली करून सरकारचा निषेध व्यक्त केला.

यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तसच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची पोस्टर बाजी चांगलीच लक्षवेधी ठरली.

यावेळी राष्ट्रवादी युवक चे प्रदेशाध्यक्ष यांनी सरकार वर हल्लाबोल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *