गडचिरोली: नक्षल चळवळीतील नर्मदाक्काला तिच्या पतीसह अटक

नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या नर्मदाक्काला तिच्या पतीसह अटक करण्यात आली आहे.गडचिरोली, जिल्ह्यातील नक्षल चळवळीत नर्मदाक्का प्रमुख स्थानी होती. तिचा पती किरणकुमार याच्यासह गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे. तिच्यावर जाळपोळ, हत्या, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान अशा हिंसक प्रकरणात एकूण 53 गुन्हे दाखल आहेत.
कोण आहे ही नर्मदाक्का ?
वयाची पासष्टी पूर्ण केलेली नर्मदाक्का उर्फ अल्लुरी उषा राणी ही आंध्रप्रदेशातील गुरवडा येथील मूळ रहिवासी
२५ वर्षांहून अधिक काळापासून नक्षल चळवळीत आहे.
नर्मदाक्का ही दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आहे. तसेच ती डीकेएएमएसची इन्चार्जही आहे.
नर्मदाक्का एके-४७ हे शस्त्र वापरणात असून हिच्याच नेतृत्वात जिल्ह्यातील बहुतांश नक्षली काम केली जातात.
आतापर्यन्त झालेल्या अनेक जाळपोळी व हत्यांची मास्टर माईंड असल्याचा आरोप नर्मदाक्कांवर आहे.
राज्य शासनाने तिच्यावर सुमारे 25 लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते.
दोघांना काल तेलंगणातून गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले.
रात्रीच त्यांना अहेरी व नंतर गडचिरोली येथे आणण्यात आले, अशी माहिती सुत्राकडून मिळत आहे.
यासंदर्भात पोलिसांनी अधिकृतरित्या दिजारा मिळाला नाही