Fri. Sep 20th, 2019

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

0Shares

आज सगळ्यांचा लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली असून पुण्यासह मुंबईतही निरोपाची तयारी सुरू झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती अर्थात मुंबईचा राजा आणि लालबागचा राजाच्या आरतीला सुरुवात झाली आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष भक्त गण करत आहेत. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला कोळी महिलांनी पारंपारिक नृत्य करत निरोप देत आहेत. पुण्यातही दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सकाळी 10 पासून सुरुवात होणार आहे.

पुण्यात विर्सजन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असून भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

पुण्यात सकाळी 10 पासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या गणपतीची पूजा केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल.

या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *