Thu. Jan 27th, 2022

गांधीजींच्या चष्म्याची चोरी, 8 वर्षांनी आरोपीला ‘ही’ शिक्षा!

सेवाग्राम आश्रमातील ‘बापू कुटी’मधून महात्मा गांधी यांचा चष्मा आठ वर्षांपूर्वी चोरीला गेला होता. या घटनेची CID चौकशी होऊन एकाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला निर्दोष मुक्त केलंय. मात्र आरोपीचं या घटनेमध्ये मोठं नुकसान झालंय.

काय आहे हे प्रकरण?

1946 साली जेव्हा महात्मा गांधीजी सेवाग्राम सोडून दिल्लीला गेले.

त्यावेळेस त्यांच्या नित्योपयोगी वस्तू स्मारक म्हणून आश्रमात जपून ठेवल्या होत्या.

या वस्तूंमध्ये महात्मा गांधीजींचा चष्मासुद्धा होता.

कोणीतरी दोन मुलांनी बापू कुटींच्या  काचेच्या शोकेस मधून महात्मा गांधींचा चष्मा चोरला.

या चष्म्याचा बराच शोध घेतला परंतु चष्मा मिळाला नाही.

गांधीजींचा चष्मा चोरीला गेल्याची तक्रार सेवाग्राम आश्रमाच्या वतीने 13 जून 2011 रोजी पोलीस स्टेशनला करण्यात आली.

तक्रार दिल्यानंतर हा तपास CID कडे सोपविण्यात आला.

CID ने तपासादरम्यान हिंदनगर येथील आरोपी कुणाल वैद्य याला अटक केली.

तपासाअंती CIDने वर्धा मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे कोर्टात भारतीय दंड विधानाचे कलम 380 अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केले.

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी वकिलांनी सरकार तर्फे बरेचसे साक्षीदार तपासले.

आरोपी कुणाल तर्फे वकील रोशन राठी यांनी कुणालची बाजू मांडली.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी श्री आयचीत यांनी आरोपी कुणालला प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले

कुणाल हा तांत्रिक अभियंता आहे. तो नागपूर येथे सध्या नोकरीला आहे.

मात्र गांधीजींचा चष्मा चोरल्याच्या आरोपांमुळे विदेशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न त्याला पूर्ण करणं शक्य झालं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *