Thu. Jun 20th, 2019

गुंगीचे औषध देवून नोकर चोरी करून फरार

0Shares

लष्करी अधिकाऱ्यासह आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे औषध देवून, नोकरांनी घरातील लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. यामध्ये पोलीस या फरार नोकरांचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

लष्करी अधिकाऱ्यासह आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आलं आहे.

दीपक नेरकर असं लष्करी अधिकारी यांचं नाव असून ते पुण्यातील एनडीए येथे कार्यरत आहेत.

दीपक यांच्या पत्नी आणि मुलं काल दुपारी खरेदीसाठी बाहेर गेले होते.

तेंव्हा गीता नेपाळी आणि महेश नेपाळी या नोकरांनी जेवणात गुंगीचे औषध टाकले.

ते जेवण दीपक आणि त्यांच्या आई-वडिलांनी खाल्ल्याने ते झोपी गेले.

मग गीता आणि महेश सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाले.

पत्नी आणि मुलं घरी परतले, अगदी रात्र होऊ लागली तरी पती उठले नव्हते.

पतीला उठवण्याचा प्रयत्न केला पण ते शुद्धीवर येत नव्हते तेंव्हा पत्नीला संशय आला. घराची झडती घेता हा प्रकार समोर आला.

पती, सासू आणि सासऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पिंपरी पोलीस लुटारू नोकरांचा शोध घेत आहेत.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: