गुंतवणूकदारांना एलआयसीचा जोरदार झटका

एलआयसी भारतीय आयुर्विमा महामंडळाने काही दिवसापूर्वीच शेअर बाजारात आपले शेअर्स लावण्यात सुरूवात केली आहे. भांडवली बाजारात पदार्पण करणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने गुंतवणूकदारांना जोरदार झटका दिला आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचे चार दिवसांत ७७ हजार ६०० कोटी बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे. एलआयसीचा आयपीओ १७ मे २०२२ रोजी सूचीबद्ध झाली. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण कायम सुरू आहे. एलआयसी हा देशातील आजवरचा मोठा आयपीओ ठरला असला तरी त्याने गुंतवणूकदार मात्र कंगाल केले आहे.
एलआयसीने मंगळवारी १७ मे २०२२ रोजी भांडवली बाजारात प्रवेश केला. आयपीओसाठी शेअर ९४९ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच दिवशी हा शेअर ८६७ रुपयांना सूचीबद्ध झाला. इश्यू किंमतीच्या तुलनेत शेअरची जवळपास ९ टक्के सवलतीत नोंदणी झाली. यामुळे गुंतवणूकदारांची घोर निराशा झाली. पहिल्याच दिवशी एलआयसीचा शेअरने सुमार कामगिरी केली.
या पडझडीनंतर शुक्रवार अखेर एलआयसीचे बाजार भांडवल ५,२२,६०२.९४ कोटी इतके खाली आले. त्यात ७७,६३९.०६ कोटींची घसरण झाली. याचा मोठा फटका सामान्य गुंतवणूकदारांना बसला आहे. त्याशिवाय कंपनीनं देखील बाजार भांडवलानुसार पाचवी मोठी कंपनी असल्याचा बहुमान गमावला आहे.