Wed. Jul 28th, 2021

गुरूपौर्णिमा उत्सवादरम्यान साईभक्तांकडून शिर्डी संस्थानात जमा झाली ‘इतक्या’ कोटींची देणगी!

गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सोमवार 15 जुलै 2019 ते बुधवार 17 जुलै 2019 या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये 4 कोटी 52 लाखइतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली….

यामध्‍ये दक्षिणापेटीच्या मोजणीत 2 कोटी 12 लाख 99 हजार 158 रुपये,

देणगी काऊंटरवर 1 कोटी 7 लाख 3 हजार 351 रुपये,

डेबीट-क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक-डी.डी., मनी ऑर्डर देणगी आदीव्‍दारे 1 कोटी 3 लाख 8 हजार 180 रुपये,

18 लाख 87 हजार रुपयांचं 645.015 ग्रॅम सोनं

1 लाख 30 हजार रुपये किमतीची 5032 ग्रॅम चांदी,

17 देशांचे परकीय चलन अंदाजे रुपये 8 लाख 94 हजार 444.50 यांचा समावेश आहे.

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या कालावधीत 1लाख 86 हजार 783 साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला.

यामध्‍ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश असून ऑनलाईन आणि सशुल्‍क दर्शन आरती पासेस व्‍दारे 67 लाख 45 हजार रुपये प्राप्‍त झालेले आहे.

तसंच उत्‍सव कालावधीमध्‍ये साईप्रसादालयामध्‍ये 2 लाख 541 साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घे,तला तर दर्शन रांगेतुन 2 लाख 10 हजार 400 साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचं वाटप करण्‍यात आलं.

या कालावधीत 1लाख 78 हजार 146 प्रसादरुपी लाडू पाकीटांची विक्री करण्‍यात आली.

तसंच श्री साईप्रसाद निवासस्‍थान, साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, व्‍दारावती निवासस्‍थान, साईआश्रम भक्‍तनिवास आणि साईधर्मशाळा येथे 49 हजार 554 साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली.

तर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेकरीता उभारण्‍यात आलेल्‍या मंडपामध्‍ये सुमारे 5 हजार 819 साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तसंच साईधर्मशाळा येथे 40 पालख्‍यांची निवास व्‍यवस्‍था करण्‍यात आली असल्‍याचं मुगळीकर यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *