Sun. Oct 24th, 2021

गोष्ट पर्रिकरांच्या ‘मनोहर’ नात्याची…

गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचं संरक्षण मंत्रीपद भूषवलेले मनोहर पर्रिकर यांचं वयाच्या ६३ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्यामागे त्यांची दोन मुलं उत्पल आणि अभिजात आहेत. त्यांची पत्नी मेधा यांचं 2001 सालीच निधन झालं. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या पर्रिकरांनी आपलं पूर्ण लक्ष रकाजकारणावर केंद्रीत केलं. मात्र त्याचवेळी आपल्या पत्नीचं स्वप्न असणाऱ्या फॅक्टरीच्या कामातही ते जातीने लक्ष घालत होते.

नातं मेधा आणि मनोहर यांचं…

मेधा आणि मनोहर पर्रिकरांचा प्रेमविवाह होता.

ज्यावेळी मनोहर पर्रिकर आयआयटी मुंबईत शिकत होते, तेव्हा बऱ्याचदा घरच्या जेवणाच्या चवीसाठी पर्रिकर थेट मुंबईत बहिणीच्या घरी जायचे.

मेधा या पर्रिकरांच्या बहिणीच्या नणंद होत्या.

त्यामुळे बहिणीच्या घरीच दोघांच्या गाठीभेटी होत.

दोघांचंही पुस्तकांवर, वाचनावर अतोनात प्रेम होतं.

पुस्तकांबद्दल चर्चा करता करता दोघे ऐकमेकांच्या कधी प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही.

अतिशय साध्या पद्धतीने मेधा आणि मनोहर यांचा विवाह झाला.

दोघांनी गोव्यामध्ये संसार थाटला.

काही काळाने उत्पल आणि अभिजात ह्या दोन मुलांचा जन्म झाला.

या काळात मनोहर पर्रिकर गोव्यातली फॅक्टरी, संघचालकपद आणि भाजपासाठी काम, या जबाबदाऱ्या सांभाळत होते.

त्यानंतर 1994 मध्ये पर्रिकर पहिल्यांदा गोव्यात आमदार झाले.

खरं तर मेधा आणि मनोहर पर्रिकर या दोघांनी व्यवसायात यशस्वी होण्याची स्वप्नं पाहिली होती. म्हणूनच पुढची 10 वर्षंच राजकारण करीन, नंतर फक्त फॅक्टरीचं काम पाहीन, असं वचनही मनोहर पर्रिकरांनी मेधा यांना दिलं होतं.

2000 साली मनोहर पर्रिकर मुख्यमंत्रीही झाले.

परंतु दैवाचे फासे उलटे पडले.

मेधा यांची तब्येत बिघडली. त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि अवघ्या महिन्याभरातच त्यांचं निधन झालं.

या घटनेने पर्रिकर मनातून हादरून गेले.

राजकारण सोडण्याऐवजी आपलं मन राजकारणातच जास्तीत जास्त गुंतवू लागले.

ते दिवसाचे 14 – 15 तास काम करत.

आपल्या दोन्ही मुलांना वडिलांबरोबरच आईचंही प्रेम त्यांनी दिलं.

स्वादूपिंडाच्या कॅन्सरमुळे पर्रिकर यांचं निधन झालं.

पत्नीप्रमाणेच पर्रिकर यांचंही कॅन्सरनेच निधन होणं हा विचित्र योगायोगच म्हणावा लागेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *