Sat. Feb 22nd, 2020

घटस्फोट मागणाऱ्या पत्नीला पोटगीची रक्कम चिल्लरच्या रूपात!

पोटगीची रक्कम देण्यासाठी पतीने चक्क न्यायालयात चिल्लर आणल्याने काही काळ न्यायालयात सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. क्षुल्लक कारणावरून एका दाम्पत्याचं भांडण झालं आणि वाद इतका विकोपाला गेला की थेट न्यायालयापर्यंत हा वाद पोहोचला.

सध्या या वादासंदर्भात नाशिक रोड न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

दरम्यान निकाल लागेपर्यंत महिना दोन हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने पतीला दिले होते.

याच पोटगीतील काही रक्कम देण्यासाठी पतीने चक्क न्यायालयात चिल्लर आणले होते.

पत्नीने अगदी चिल्लर कारणावरून आपल्याशी भांडण केल्यामुळे अशाप्रकारे चिल्लरच्या माध्यमातून पोटगी देत इतर कोणीही चिल्लर कारणावरून भांडण करू नये असं संदेश देखील देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केल्याचं पतीने सांगितलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *