Tue. Apr 7th, 2020

चंद्रपूरमध्ये मिक्सरचा लोभ महागात पडला, 15 महिलांची प्रकृती बिघडली!

भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी रक्षाबंधननिमीत्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राखी भेट म्हणून या महिलांना मिक्सर भेट देण्यात येणार होते. यामुळे 25 हजारांवर महिला या कार्यक्रमास हजर राहिल्या. या महिलांची व्यवस्था न केल्याने त्यांतील 15 महिलांची प्रकृती अस्वस्थ आहे. या महिलांना उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

15 महिलांची प्रकृती अस्वस्थ

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या तालुक्याच्या ठिकाणी भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात सुमारे 25 च्या वर महिला चक्कर येवून कोसळल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं एकच खळबळ उडाली. चिमूर मतदारसंघातील महिलांना आज मिक्सरची राखी भेट देण्याची घोषणा करण्यात आली होती.

चिमूर क्रांती दिनानिमित्त हा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. कार्यक्रम दुपारी 3 वाजताच्या सुमारास सुरू झाला. मात्र तालुक्यातील महिला सकाळी नऊ वाजेपासून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचल्या. पाहता-पाहता 25 हजारांवर महिला इथं मिक्सरच्या अपेक्षेने उपस्थित झाल्यानं आमदार भांगडीयाचं नियोजन पूर्णपणे ढेपाळलं.

या महिलांना साधं पिण्याचं पाणीही उपलब्ध होऊ शकलं नाही. त्यातच तीव्र ऊन आणि मंडपात झालेल्या गर्दीनं जीव कासावीस होऊन सुमारे 25 वर महिला चक्कर येऊन कोसळल्या. त्यांना लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, या प्रकारानं कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.

हा सगळा प्रकार अमृता फडणवीस येण्यापूर्वी घडला. त्यामुळं कार्यक्रमावर परिणाम झाला नाही. पण गर्दी जमवण्याचा नादात आमदार भांगडिया यांनी केलेला हा प्रयत्न लोकांच्या जीवावर बेतला असता. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयानं 15 महिला दाखल झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *