Wed. Jun 19th, 2019

चक्क कुत्र्यासाठी नवस, जागरण आणि गोंधळ!

0Shares

एखाद्या कुटुंबामध्ये लग्नकार्य असेल तर जागरण गोंधळ घालण्याची परंपरा खूप वर्षांपासून आहे. पण पुण्यातील एक कुटुंबाने लाडक्या कुत्र्याची आजारपणातून लवकर सुटका व्हावी यासाठी चक्क जागरण गोंधळाचा कार्यक्रम घातला.

कुत्र्यासाठी जागरण गोंधळ!

पुण्यातील धनकवडी परिसरात राहणारे नाना जाधव यांच्याकडे दोन वर्षं वयाचा रॉटविलर जातीचा कुत्रा आहे.

त्याचं नाव ब्रुनो आहे.

या कुत्र्याला गॅस्ट्रो झाल्याने त्याला काही खातापिता येत नव्हतं.

त्यामुळे तो सलाईनवर होता.

तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना खंडोबाला नवस करण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर जाधव यांनी जेजुरीच्या खंडोबाला ब्रुनो जर या आजारातून जगला तर जागरण गोंधळ घालू असा नवस केला.

ब्रुनो आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्यांनी बकरे कापून लोकांना जेवू घातलं.

जागरण गोंधळ घालून नवस पूर्ण केला.

यासाठी त्यांनी सोलापूर येथील प्रसिद्ध गोंधळी अंकू-पंकू यांना बोलावून अगदी थाटात हा नवस पूर्ण केला. या आगळ्या वेगळ्या जागरण गोंधळाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: